9/11 प्रमाणेच उडवू एअर इंडियाचे विमान! धमकींतर दिल्ली विमानतळावर अलर्ट

फोन करणाऱ्या 9/11 च्या धर्तीवरच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा फोन कॉल दिल्लीतील रणहोला पोलिस ठाण्यात आला होता.

    दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका फोनवरून देण्यात आल्यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला.

    फोन करणाऱ्या 9/11 च्या धर्तीवरच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा फोन कॉल दिल्लीतील रणहोला पोलिस ठाण्यात आला होता.

    यापूर्वीही एक धमकीचा कॉल आला होता त्यात दिल्ली विमानतळाचा ताबा घेणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.