देशातील अल कायदाच्या नेटवर्कचा पर्दाफाश, एनआयएच्या छाप्यात ९ दहशतवाद्यांना अटक

केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या छाप्यात एनआयएने केरळमधील एर्नाकुलम येथून ३ आणि बंगालमधील मुर्शिदाबाद येथून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) अल-कायदाचे ( Al-Qaeda) मोठे जाळे उघडकीस आणत ९ संशयितांना अटक (Arrest) केली आहे. अल-कायदाच्या या मॉड्यूलमुळे केरळ (Keral) ते पश्चिम बंगाल (West Bengal) पर्यंत छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या छाप्यात एनआयएने केरळमधील एर्नाकुलम येथून ३ आणि बंगालमधील मुर्शिदाबाद येथून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांनी बर्‍याच सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य केले असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांचे वय सुमारे २० वर्षे आहे आणि सर्व मजूर म्हणून काम करतात. दहशतवादी कारस्थानाची माहिती मिळाल्यानंतर एनआयए त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.


एनआयएने आज सकाळी एर्नाकुलम (केरळ) आणि मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) मधील अनेक ठिकाणी एकाच वेळी हा छापेमारी केली. यामुळे दोन्ही ठिकाणांहून पाकिस्तान पुरस्कृत अल-कायदाचे मॉड्यूल असलेले ९ दहशतवादी पकडले गेले.


पश्चिम बंगाल आणि केरळसह देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अल-कायदाच्या सदस्यांच्या आंतरराज्यीय मॉड्यूलविषयी एनआयएचा सुगावा लागल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे हा छापा टाकण्यात आला. हे दहशतवादी देशातील अनेक महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याच्या विचारात होते. एनआयएचा तपास अजूनही सुरू आहे.