mayawati

उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुका बसपा स्वबळावर लढेल. युती केल्यामुळे फक्त मित्र पक्षांनाच फायदा होतो. देशात अनेक राज्यात निवडणूक होऊ घातल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू राज्यात बसपा स्वबळावर निवडणूक लढेल, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. तसेच या राज्यात बसपा कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नसल्याचे मायावतींनी स्पष्ट केले आहे.

    दिल्ली : युती केल्यामुळे फक्त मित्र पक्षांनाच फायदा होतो. म्हणून आगामी निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत युती न करण्याच निर्णय बसपा अध्यक्षा मायावती यांनी जाहीर केला आहे. तसेच केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बसपाचे संस्थापाक कांशीराम यांच्या जंयतीनिमित्त मायावती बोलत होत्या.

    मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुका बसपा स्वबळावर लढेल. युती केल्यामुळे फक्त मित्र पक्षांनाच फायदा होतो. देशात अनेक राज्यात निवडणूक होऊ घातल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू राज्यात बसपा स्वबळावर निवडणूक लढेल, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. तसेच या राज्यात बसपा कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मायावती म्हणाल्या की, देशातील शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावे. या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.