Coronavirus patients get fungal infections, eyes, nose and jaw fail

देशात ब्लॅक फंगसचा प्रकोप वाढत असतानाच आता ‘व्हाइट फंगस’ची एंट्री झाली आहे. बिहारमधील पाटण्यात ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या या व्हाईट फंगसचे 4 रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हाईट फंगस (कँडिडोसिस) फुफ्फुसातील संक्रमणाचे मुख्य कारण आहे.

  दिल्ली : देशात ‘ब्लॅक फंगस’चे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराचाही साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत समावेश केला आहे. साथ रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम आता या आजारासाठी लागू होतील. याबाबतचे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहे. सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांनी ब्लॅक फंगसची तपासणी, निदान आणि व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्यांना लिहिलेला पत्रात म्हटले आहे. सर्व संशयित, आजारी रुग्णांची माहिती केद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणे बंधनकारक असेल.

  ब्लॅक फंगसबाबत एम्सकडून नवी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. ब्लॅक फंगसचा आजार जडण्याची शक्यता असलेल्या रुग्णांची वारंवार तपासणी करा, अशा सूचना एम्सने डॉक्टरांना दिल्या आहेत. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, आणि जे स्टेरॉइड किंवा टोसिलिजुमैब इंजेक्शनचा वापर करत आहेत, त्यांना ब्लॅक फंगसचा सर्वात जास्त धोका आहे. तसेच ज्या व्यक्ती कर्करोगवरील उपचार घेत आहेत, किंवा खूप दिवसांपासून एखाद्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांनाही धोका आहे. कोरोनामुळे जे रुग्ण ऑक्सिजन मास्क किंवा व्हेंटिलेटरवर आहेत, अशा रुग्णांनाही ब्लॅक फंगसची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

   ‘ब्लॅक फंगस’ची लक्षणे?

  • नाकातून रक्त येणे, डोक्यात घाण जमा होणे
  • नाक बंद होणे, डोके आणि डोळे दुखणे, डोळ्यांभोवती सूज येणे, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, पापण्यांची उघडझाप करण्यात अडचण येणे
  • चेहरा सुन्न पडणे, खाज सुटणे
  • तोंड उघडण्यात तसेच अन्न चावण्यात अडचणी निर्माण होणे
  • दात पडणे, तोंडात सूज येणे

  आता ‘व्हाइट फंगस’चा धोका; अशी आहेत लक्षण

  देशात ब्लॅक फंगसचा प्रकोप वाढत असतानाच आता ‘व्हाइट फंगस’ची एंट्री झाली आहे. बिहारमधील पाटण्यात ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या या व्हाईट फंगसचे 4 रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हाईट फंगस (कँडिडोसिस) फुफ्फुसातील संक्रमणाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसासोबपतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित करतो. व्हाईट फंगसमुळे फुफ्फुसात झालेले संक्रमण एचआरसीटीमध्ये कोरोनासारखेच दिसते. त्यामुळे कोरोना आणि व्हाईट फंगसमध्ये अंतर करणे अवघड आहे. व्हाईट फंगस झालेल्या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह येतात.