farmers

भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी याबाबतीत सांगितले की, यास शाहीन बाग बनवू देऊ नका. संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले तरी हे आंदोलन संपणार नाही. जी कोरोनासाठीची मार्गदर्शकतत्त्वे असतील, त्याचे पालन आंदोलनस्थळीच केली जातील, असे त्यांनी सांगितले. परंतु आंदोलनस्थळावर नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. शेतकरी तोंडावर न मास्क लावत आहेत, न सॅनिटायझरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे.

    दिल्ली : देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे व परिस्थिती बिघडत चालली आहे. कोरोनामुळे सगळीकडे धोका वाढला आहे. अशातच दिल्लीच्या सीमांवर शेकडोंच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांवरही कोरोनाचा धोका आहे. अशातच शेतकरी आंदोलन मागे न घेण्याविषयी पुनरुच्चार करीत आहेत.

    भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी याबाबतीत सांगितले की, यास शाहीन बाग बनवू देऊ नका. संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले तरी हे आंदोलन संपणार नाही. जी कोरोनासाठीची मार्गदर्शकतत्त्वे असतील, त्याचे पालन आंदोलनस्थळीच केली जातील, असे त्यांनी सांगितले. परंतु आंदोलनस्थळावर नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. शेतकरी तोंडावर न मास्क लावत आहेत, न सॅनिटायझरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे.

    दुसरीकडे, सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. शेतकरी व सरकार दोन्ही चर्चेसाठी तयार आहेत, परंतु ते टेबलपर्यंत येऊ शकत नाही. अशातच शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आहे हे मात्र नक्की.