अ‍ॅमेझॉनमधील भारतीय कर्मचार्‍यांना बोनसचे गिफ्ट जाहीर

E- कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) ही भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना ६३०० रुपयांपर्यंत स्पेशल रिकग्निशन बोनस देण्याची घोषणा केली आहे; विशेष म्हणजे हा बोनस परदेशात त्यांच्या कर्मचार्‍यांना दिलेल्या बोनसच्या अनुरुपच असणार आहे. कंपनीने ब्लॉगपोस्टमध्ये याची घोषणा केली. कंपनीने 'मेक अ‍ॅमेझॉन पे' या जागतिक प्रचार मोहिमेच्या दरम्यान ही घोषणा केली.

  • भारतीय कामगारांमध्ये आनंदी आनंदाचे वातावरण

दिल्ली (Dehli). E- कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) ही भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना ६३०० रुपयांपर्यंत स्पेशल रिकग्निशन बोनस देण्याची घोषणा केली आहे; विशेष म्हणजे हा बोनस परदेशात त्यांच्या कर्मचार्‍यांना दिलेल्या बोनसच्या अनुरुपच असणार आहे. कंपनीने ब्लॉगपोस्टमध्ये याची घोषणा केली. कंपनीने ‘मेक अ‍ॅमेझॉन पे’ या जागतिक प्रचार मोहिमेच्या दरम्यान ही घोषणा केली.

कंपनीच्या ब्लॉगपोस्टमध्ये अ‍ॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणाले की, कंपनीच्या भारतीय कामकाजामध्ये पूर्णवेळ काम करणा-या कर्मचार्‍यांना ६३०० रुपयांपर्यंतचा खास बोनस आणि अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना ३१५० रुपयांपर्यंतचा बोनस दिला जाणार आहे.

हा बोनस १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर रोजी कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या पात्र कर्मचा-यांना देण्यात येणार आहे. आम्ही आमच्या टीमचे आभार मानतो, जे लोकांच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्ही नुकताच भारतात सणासुदीचा काळ पार केला असल्याने कंपनीला आपल्या टीमला रिकग्निशन बोनस देऊन अभिनंदन करायचे आहे.

केवळ चालू तिमाहीत अ‍ॅमेझॉन त्याच्या फ्रंट-लाइन एव्हर्ली वर्कफोर्ससाठी ७५ कोटी अतिरिक्त पगाराच्या स्वरूपातील रकमेची गुंतवणूक करीत आहेत. हे त्याच्या नियमित पगारावर अवलंबून आहे. २०२० मध्ये कंपनीच्या विशेष बोनस आणि प्रोत्साहनपर कंपनीचा जागतिक खर्च १८५०० कोटी रुपये पर्यंत गेला आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या ५० कोटी डॉलरच्या थँक्यू बोनसचा देखील समावेश आहे.