अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार का ? अमित शहांच्या भेटीनंतर स्वत: केला खुलासा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग(Amrinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shaha) यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग(Amrinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shaha) यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आपण भाजपात सामील होणार (Amrinder Singh Is Not Joining BJP) नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलंय.त्यामुळे अमरिंदर सिंग यांचं पुढचं पाऊल नक्की काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

    अमरिंदर सिंग एका मुलाखतीत म्हणाले, “आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.

    दरम्यान, आज अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. डोवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अमरिंदर सिंग यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे दिली असल्याचे समोर आले आहे.

    आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अनुसुचित जातीचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.