ronaldo removes coca cola bottle

    दिल्ली : काही काळापूर्वी फुटबॉल स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याने कोका कोलाची बेइज्जती केल्याने कंपनीला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यातून थोडे सावरत असतानाच पुन्हा एकदा वेगळ्याच संकटाला सामोरे जाण्याची पाळी कंपनीवर आली असल्याचे समजते. यावेळी कंपनीला अल्युमिनियम कॅनची प्रचंड टंचाई जाणवत आहे.

    कंपनीची डायट कोक, कोक झिरो ही उत्पादने प्रचंड लोकप्रिय आहेत आणि ती कॅनमधून विकली जातात. कोरोनामुळे विशेषतः ब्रिटनमध्ये मालवाहतूकीवर फारच विपरीत परिणाम झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांची तेथे अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनीला अल्युमिनियम कॅन्सचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी या दोन्ही उत्पादनांची विक्री कमी करावी लागली आहे.

    रोड हॉलेज असोसिएशनने 1 लाख हेवी गुड्स ड्रायव्हर्सची कमतरता असल्याचे मान्य केले असून त्यामुळे मालवाहतूक करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ही समस्या आणखी वाढेल अशी चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम कोका कोला कंपनीवर पडतो आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]