अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानींना पुन्हा एक जबर झटका; संपत्तीचा ऱ्हास सुरू

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानींना पुन्हा एक जबर झटका बसला आहे. जगभरातील अब्जोपतींमध्ये समावेश असलेल्या अदानींची मालमत्ता 1.31 बिलियन डॉलरने कमी झाली असल्याचे ब्लूमबर्ग बिलेनियरच्या अहवालात नमूद केले आहे. आता गौतम अदानींची संपत्ती 51.4 बिलियन डॉलर झाली आहे.

    दिल्ली : अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानींना पुन्हा एक जबर झटका बसला आहे. जगभरातील अब्जोपतींमध्ये समावेश असलेल्या अदानींची मालमत्ता 1.31 बिलियन डॉलरने कमी झाली असल्याचे ब्लूमबर्ग बिलेनियरच्या अहवालात नमूद केले आहे. आता गौतम अदानींची संपत्ती 51.4 बिलियन डॉलर झाली आहे.

    हा निर्देशांक अब्जोपतींच्या रॅकिंगवर व्यवसायाच्या प्रत्येक दिवशी बदलत असतो. अब्जोपतींच्या यादीत अदानींचे 25 वे रॅकिंग आहे. ते आशियातील चौथे अब्जोपती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची संपत्ती 70 बिलियन डॉलरपेक्षा अधिक झाली होती व ते आशियातील दुसरे श्रीमंत अब्जोपती ठरले होते.