अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टानंतर भारतात कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. हा व्हेरिएंट सात दिवसांत रुग्णाचे वजन कमी करू शकतो. ब्राझीलमध्ये सापडलेल्या या व्हेरिएंटचा एकच प्रकार आतापर्यंत भारतात आढळला होता. मात्र, आता ब्राझीलमधील हे दोन्ही व्हेरिएंट भारतात आले आहेत. हा दुसरा प्रकार बी.1.1.28.2 असून, तो जास्त संक्रमणकारक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

    दिल्ली : अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टानंतर भारतात कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. हा व्हेरिएंट सात दिवसांत रुग्णाचे वजन कमी करू शकतो. ब्राझीलमध्ये सापडलेल्या या व्हेरिएंटचा एकच प्रकार आतापर्यंत भारतात आढळला होता. मात्र, आता ब्राझीलमधील हे दोन्ही व्हेरिएंट भारतात आले आहेत. हा दुसरा प्रकार बी.1.1.28.2 असून, तो जास्त संक्रमणकारक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

    या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याने सात दिवसांच्या आत संबंधित व्यक्ती ओळखला जाऊ शकतो. हा व्हेरिएंट शरीराचे वजन वेगाने कमी करू शकतो. तो डेल्टाप्रमाणे अधिक गंभीर आहे. शास्त्रज्ञांनी या व्हेरिएंटचे परीक्षण एका उंदरावर केले असून त्याचे निष्कर्ष धक्कादायक आले आहेत.

    डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच हादेखील शरीरातील अँटीबॉडीजची क्षमता कमी करतो, असे निष्कर्षात म्हटले आहे. बी.1.1.28.2 व्हेरिएंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळला होता. या व्हेरियंटची जीनोम सिक्वेंसिंग करून नंतर परीक्षण करण्यात आले. सध्या भारतात याची जास्त प्रकरणे नाहीत.