The government is not ready to discuss directly with the farmers

गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. पहाटेच्या सुमारास ४-५ डिग्री पर्यंत तामपमानाची नोंद करण्यात येत आहे. धुरक्यामुळे मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषणही असल्याने सातत्याने शहरात धुरक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते.

नवी दिल्ली:कडाक्याच्या थंडीमुळे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मागील २२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्ली हरियाणाच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्या २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे मृत्यू केवळ थंडीमुळे झाल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. मृत शेतकऱ्याला दहा , बारा व चौदा वर्षांची तीन मुलं असून संबंधित मृत शेतकरी सुरुवातीपासून या आंदोलनात सहभागी झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. पहाटेच्या सुमारास ४-५ डिग्री पर्यंत तामपमानाची नोंद करण्यात येत आहे. धुरक्यामुळे मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषणही असल्याने सातत्याने शहरात धुरक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. थंडीपासून आंदोलकांचा बचाव करण्यासाठी अनेक स्वंयसेवी संस्था व नागरिकांकडून स्वेटरचे वाटप ही केले जात आहे. ,