पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील पळपुटा हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा आणखी एक कारनामा; पोलिसांनी उधळला डाव

भारताचे नागरिकत्व कायदा कलम 9 नुसार, चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेताच त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द झाले आहे. अशा स्थितीत कलम 17 आणि 23 नुसार त्याला अँटिग्वाकडेच सुपूर्द केले जाऊ शकते. सद्यस्थितीत अंटिग्वातील हायकोर्टानेही भारताने केलेल्या अपिलावरील कारवाईस स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्याला अंटिग्वा येथेच आणण्यात येईल. भारतात पाठविण्याचा प्रश्नच नाही.

  दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील पळपुटा हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये पोलिसांनी जेरबंद केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्यूबामध्ये पळून जाण्याचा त्याचा डाव होता, तथापि पोलिसांमुळे तो उधळण्यात आला. ज्यावेळी मेहुलला पोलिसांनी अटक केली त्यावेळी तो समुद्र किनाऱ्यावर काही महत्त्वाची दस्तावेज नष्ट करीत होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली. यापूर्वी इंटरपोलने त्याच्या अटकेसाठी नोटीस जारी केली होती. आता त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची तयारी केली जात आहे. दरम्यान त्याने कोणते पुरावे समुद्रात फेकले याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्याने फेकलेले पुरावे शोधण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

  बोटीच्या साह्याने प्रवेश

  सद्यस्थितीत मेहुल डोमिनिका पोलिसांच्या कोठडीत आहे. जेथे एकही विमानतळ नाही, अशा उत्तर डोमिनिका भागातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका बोटीच्या सहाय्याने त्याने डोमिनिकात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. राजधानी रोज येथील कॅनफिल्ड बीचवरही तो दिसला होता अशी माहिती पोलिसानी दिली. त्यावेळी तो काही दस्तावेज समुद्रात फेकत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानेच पोलिसांनी त्याची चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

  भारतात प्रत्यार्पण करणार

  दरम्यान, चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे. मेहूल लबाडच असल्याचे सांगत अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांनी चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे संकेत दिले आक्त. त्याने केलेल्या गुन्ह्यांबाबत आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी दिले.

  भारतात पाठविण्याचा प्रश्नच नाही