Another vaccine for ‘under 18’; Johnson & Johnson asked permission for the trial
FILE PHOTO: Vials with a sticker reading, "COVID-19 / Coronavirus vaccine / Injection only" and a medical syringe are seen in front of a displayed Johnson & Johnson logo in this illustration taken October 31, 2020. REUTERS/Dado Ruvic/File Photo

दोन आठवड्यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना व्हॅक्सिनला भारतात मंजुरी देण्यात आली. आता आम्ही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी अर्ज केला आहे. लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

    दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांनी संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तातडीने पाऊले उचलली जात आहे. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी एक लस लवकरच येण्याची शक्यता आहे. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी मागितली आहे.

    दोन आठवड्यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना व्हॅक्सिनला भारतात मंजुरी देण्यात आली. आता आम्ही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी अर्ज केला आहे. लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

    भारत सरकारने 7 ऑगस्ट 2021 रोजी आमच्या एक मात्रेच्या लसीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता 85 टक्के आहे. सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला.