प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटची कोव्हीशिल्ड आणि हैदराबाद येथील कोव्ह्क्सीन या दोन लसींद्वारे देशात लसीकरण सुरु आहे. त्यानंतर कोरोनाच्या लढ्यात देशाला आणखी बळ मिळणार आहे. सीरम इन्स्टीट्युटने आणखी एक लस आणली जाणार आहे.

    दिल्ली (Delhi).  पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटची कोव्हीशिल्ड आणि हैदराबाद येथील कोव्ह्क्सीन या दोन लसींद्वारे देशात लसीकरण सुरु आहे. त्यानंतर कोरोनाच्या लढ्यात देशाला आणखी बळ मिळणार आहे. सीरम इन्स्टीट्युटने आणखी एक लस आणली जाणार आहे. कोवोव्हॅक्स या कोरोनाच्या लशीची भारतात चाचणी सुरू झाली आहे.

    सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदार पुनावाला यांनी दिली आहे. आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोवोव्हॅक्स लशीच्या चाचणीची माहिती दिली आहे. या लशीची आफ्रिकन आणि आशियन प्रकारच्या कोरोना विषाणुवर चाचणी करण्यात आली आहे. ही लस ८९ टक्के कार्यक्षम आढळून आल्याचे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.