कृषी विरोधी कायदे तत्काळ मागे घेण्यात यावेत– राहुल गांधींनी केलं ट्विट

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काल(मंगळवार) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात घडलेल्या हिंसाचाराने, शेतकरी आंदोलनास गालबोट तर लागलचं. पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा “विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता”, हा सुविचार सांगितला आहे. तसेच, “पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तत्काळ कृषी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत.” असं देखील राहुल गांधींनी ट्वटिद्वारे म्हटलं आहे.

दिल्ली (Delhi).  राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काल(मंगळवार) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात घडलेल्या हिंसाचाराने, शेतकरी आंदोलनास गालबोट तर लागलचं. पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा “विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता”, हा सुविचार सांगितला आहे. तसेच, “पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तत्काळ कृषी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत.” असं देखील राहुल गांधींनी ट्वटिद्वारे म्हटलं आहे.

“हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही”– राहुल गांधी
“हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषी विरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.” असं राहुल गांधी म्हणाले होते.

हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचंही नाव समोर
दरम्यान, काल ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले होते. शेतकऱ्यांना चिथवण्यामागे कोण आहे याच शोध घेतला जात असताना, दीप सिद्धू व लक्खा सिंह सिधाना ही दोन नावं समोर आलेली आहेत.