लस घेऊनही अँटिबॉडिज तयार झाल्या नाहीत, लखनौमधील नागरिकाची तक्रार, अँटिबॉडी टेस्ट करू नका, आयसीएमआरचा सल्ला

लस घेतल्यानंतरही शरीरात अँटिबॉडिज तयार होत नसल्याची तक्रार लखनौमधील नागरिक प्रताप चंद्रा यांनी केली होती.पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने या प्रकरणी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला, जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल करून घेतला. 

    कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली असताना देशातील लसीकरणाचा मंदावलेला वेग पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत लसींचं उत्पादन जुलै महिन्यापासून वाढणार असून बाहेरील देशांमधून भारताला मिळणाऱ्या लसींचा पुरवठाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लस घेतल्यानंतर नागरिकांनी अँटिबॉडी टेस्ट करण्याची गरज नाही, असं आयसीएमआरनं म्हटलंय.

    लस घेतल्यानंतरही शरीरात अँटिबॉडिज तयार होत नसल्याची तक्रार लखनौमधील नागरिक प्रताप चंद्रा यांनी केली होती.पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने या प्रकरणी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला, जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल करून घेतला.

    या पार्श्वभूमीवर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून आलेली ही सूचना महत्त्वाची आहे. लसीकरण केल्यानंतर लगेचच शरीरात अँटिबॉडीज तयार होत नाहीत. त्यासाठी काही दिवस जावे लागतात, असं आयसीएमआरनं म्हटलंय.

    मात्र, प्रताप चंद्रा यांना आलेला अनुभव विदारक होता. लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर काही दिवसांतच अँटिबॉडिज तयार होतात, असं आयसीएमआरनं सांगितलं होतं. त्यानुसार लस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी प्रताप सिंग यांनी सरकारमान्य थायरो केअर लॅबमध्ये अँटिबॉडी टेस्ट केली. त्यात अँटिबॉडिज तयारच झाल्या नसल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणं त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्सची कमी झाल्याचं दिसून आलं. त्याविरोधात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केलीय.