अनुराग ठाकूर झाले कॅप्टन; टेरिटोरियल आर्मीमध्ये मिळाले प्रमोशन

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना बढती मिळाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये आता त्यांचे प्रमोशन झाले आहे.

    दिल्ली (Delhi).  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना बढती मिळाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये आता त्यांचे प्रमोशन झाले आहे. ते आधी लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आले आहे. ठाकूर यांनी सोशल मीडियावर Video शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

    जुलै 2016 मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसरप्रमाणे लेफ्टनंट पदावर नियुक्त झालो होतो. आज मला सांगताना अभिमान वाटत आहे की, माझे प्रमोशन झाले असून मी कॅप्टन बनलो आहे. भारत माता आणि तिरंग्याप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तयार आहे. जय हिंद ! अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.