केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी

परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच पीजीआय पहिल्यांदा 2017-18 मध्ये जारी करण्यात आला होता. सरकार या द्वारे देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. सन 2019-2020 चा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जारी करण्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि केरळला सर्वाधिक ग्रेडिंग इंडेक्स मिळालं आहे.

    परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच पीजीआय पहिल्यांदा 2017-18 मध्ये जारी करण्यात आला होता. सरकार या द्वारे देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

    सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी अंदमान आणि निकोबार, पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू आणि केरळमध्ये 2019-20 मध्ये या राज्यांना लेवल II मध्ये पहिली ग्रेड मिळाली आहे.