arvind kejriwal

कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination)कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. “केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा केला नाही, तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देऊ” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination)कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. “केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा केला नाही, तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देऊ” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी पुढे म्हटले आहे की, “ सगळ्यांना ही लस विकत घेणे परवडणारे नाही. सर्व देशवासियांना ही लस मोफत उपलब्ध करुन देण्याचे मी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. केंद्र काय करते, ते पाहू. केंद्राने मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला ती लस मोफत उपलब्ध करुन देऊ.”

लोकांनी कोरोनाच्या लसीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहनदेखील केजरीवाल यांनी केले आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्ध्यांना सर्वप्रथम या लसीचा डोस दिला जाईल. मागच्या वर्षभरापासून लोक त्रास सहन करतायत. लसीमुळे त्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.