जोपर्यंत दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले जात नाही, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाही; सुब्रह्मण्यम स्वामींचा दावा

देशाची राजधानी दिल्लीच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोरोना विषाणू, चिनी घुसखोरी, पाकव्याप्त काश्मीर यासारख्या ज्वलंत मुद्यांवरून आपल्याच सरकारला घेरणाऱ्या भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आता केंद्र सरकारला नवा सल्ला दिला आहे. दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करा, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले जात नाही, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाही, असे स्वामींनी म्हटले आहे.

    दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोरोना विषाणू, चिनी घुसखोरी, पाकव्याप्त काश्मीर यासारख्या ज्वलंत मुद्यांवरून आपल्याच सरकारला घेरणाऱ्या भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आता केंद्र सरकारला नवा सल्ला दिला आहे. दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करा, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले जात नाही, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाही, असे स्वामींनी म्हटले आहे.

    या मागणी संदर्भातील एक ट्वीट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे. हिंदूंच्या पुनर्जागरणासाठी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले पाहिजे. यासाठी द्रोपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिश्र यांनी केलेला अभ्यास पर्याप्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या पाहीजेत. तामिळनाडूच्या एका महान संताने दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केल्याशिवाय देशातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मला सांगितले आहे, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

    स्वामींच्या या मागणीनंतर देशात पुन्हा एकदा नामांतरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना नामांतरच्या मुद्याचे आयते कोलीत हाती मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीच्या नामांतरावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. उल्लेखनीय आहे की, डॉ. नीरा मिश्र यांनी आपल्या सखोल अभ्यातात याबाबचे पुरावे एकत्र केले आहेत. त्यात दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असल्याचे दिसून येत आहे. महाभारतातही इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख आहे. तसेच इंद्रप्रस्थबाबतचे पुरावे ब्रिटीश सरकारच्या 1911 च्या अधिसूचनेतही मिळत आहेत. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण नोंदवहीत ब्रिटीश आणि मुघलांनी इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख केल्याचे नमूद आहे.