Asuddin Owaisi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांना प्रामुख्याने विरोध केला जात आहे. या तीन कायद्यांसोबतच वीज वापराविषय कायद्यातील (Electricity Laws) प्रस्तावित बदलांना विरोध होत आहे. नव्या वीज वापराविषयीच्या बदलामुळे वीजवापरात शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान बंद होईल अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आता चांगलच राजकरण होऊ लागले आहे. विरोधी पक्षाती नेतेमंडळीदेखील या कायद्याला विरोध करत असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील त्यांच्या सुरात सूर मिसळून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांना प्रामुख्याने विरोध केला जात आहे. या तीन कायद्यांसोबतच वीज वापराविषय कायद्यातील (Electricity Laws) प्रस्तावित बदलांना विरोध होत आहे. नव्या वीज वापराविषयीच्या बदलामुळे वीजवापरात शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान बंद होईल अशी भीती काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ओवैसी यांनी ट्विट् करत या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मोदी सरकार नेहमी जे सांगत असते, त्याउलट घडतं. वीज वापराविषयीच्या प्रस्तावित बदलांच्या आधारे शेतकऱ्यांना क्रॉस-सब्सिडीपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. अनेक राज्य आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवत आहेत. वीज वापराविषयीचे प्रस्तावित बदल म्हणजे मिळत असलेली सूट रद्द करून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे.

सद्यस्थितीत गरीबांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाते आणि जास्तीचे दर बड्या कंपन्यांकडून वसूल केले जातात. पण, प्रस्तावित बदलांचा आधार घेत बड्या उद्योगपतींना ज्या दरात वीज दिली जाते त्याच दरात शेतकऱ्यांनाही वीज पुरवठा केला जावा असा भाजपा सरकारचा डाव असल्याचा आरोप ओवैसी यांनी ट्विट मध्ये केला आहे.