election commission

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

    तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी, पश्चिम बंगालचा कार्यकाळ ३० मे रोजी, आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपुष्टात येत आहे. तर, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी आणि पुद्दुचेरी विधानसभेचा कार्यकाळ ८ जून रोजी संपत आहे.

    याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत.

    पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.