केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंचे आश्वासन; भारतीय सीमेवर 2022 पर्यंत कुंपण

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. बीएसएफच्या आणि इतर पॅरामिलिटरीच्या या लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याने आज भारताने जागतिक नकाशावर एक गौरवमय स्थान निर्माण केले आहे. सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत, पण मला आपल्या निमलष्करी जवानांवर पूर्ण विश्वास आहे. घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी, ड्रोन हल्ला असे अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. पण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत.

    दिल्ली : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम अद्याप सुरू असून 2022 पर्यंत सर्व सीमा या बंदिस्त करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी दिले. ते बीएसएफच्या 18 व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी बीएसएफच्या ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्यांच्या कार्याला अमित शाह यांनी सलाम केला. वीर पुरस्काराचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले.

    देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. बीएसएफच्या आणि इतर पॅरामिलिटरीच्या या लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याने आज भारताने जागतिक नकाशावर एक गौरवमय स्थान निर्माण केले आहे. सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत, पण मला आपल्या निमलष्करी जवानांवर पूर्ण विश्वास आहे. घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी, ड्रोन हल्ला असे अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. पण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी स्वतंत्र संरक्षण धोरण आखल्यानंतर कोणीही भारताच्या सीमांना व त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र संरक्षण धोरण नव्हते. एकतर संरक्षण धोरणाचे मार्गदर्शन करणारे परराष्ट्र धोरण होते किंवा परराष्ट्र धोरण संरक्षण धोरणाने आच्छादित होते. आज या उपक्रमामुळे कोणीही भारतीयांना आव्हान देऊ शकत नाही, असे शाह म्हणाले. जम्मू एअरबेसवर नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या संदर्भात शाह म्हणाले की, डीआरडीओ आणि अन्य संस्था याला उत्तर देण्याची तयारी करत आहेत. पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटनांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या वापराबाबत आपल्याला तयार राहायला हवे. हे सीमापलीकडून हल्ल्यांसाठी ड्रोन वापरण्यापलीकडे आहे, असे शाह म्हणाले.