दंड भरण्यास टाळाटाळ; जुही चावलासह दोघांना ठोठावला 20 लाखांचा दंड

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाला नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जी वायरलेस नेटवर्क विरोधात याचिका दाखल केल्याबद्दल 20 लाखांचा दंड ठोठावला होता. अभिनेत्रीव्यतिरिक्त इतर दोन जणांनाही हा दंड ठोठावण्यात आला होता. अशा परिस्थितीत जुही चावला यांच्या अर्जावरील सुनावणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात तहकूब करण्यात आली आहे.

    दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाला नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जी वायरलेस नेटवर्क विरोधात याचिका दाखल केल्याबद्दल 20 लाखांचा दंड ठोठावला होता. अभिनेत्रीव्यतिरिक्त इतर दोन जणांनाही हा दंड ठोठावण्यात आला होता. अशा परिस्थितीत जुही चावला यांच्या अर्जावरील सुनावणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात तहकूब करण्यात आली आहे.

    न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यापासून स्वत:ला दूर केले आहे. मागील सुनावणीत न्यायमूर्ती जे.आर. मिधा यांनी म्हटले होते की, याचिकाकर्त्याच्या वर्तनामुळे कोर्टाला धक्का बसला होता, जुही आणि इतर योग्य मानाने दंड भरण्यासही तयार नव्हते. न्यायमूर्ती मिधा म्हणाले की, कोर्टाने सुस्त भूमिका दर्शवली होती आणि अवमानाची नोटीस बजावली नव्हती.

    अभिनेत्रीने अद्याप दंड भरलेला नाही आणि हे स्पष्ट आहे की, अभिनेत्री अद्याप दंड भरण्यास तयार नाही. यापुढील सुनावणी 29 जुलै रोजी अन्य खंडपीठामध्ये करण्यात येणार आहे.

    काय म्हणाले कोर्ट?

    4 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जी वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणारी जुही चावला यांची याचिका कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग म्हणून फेटाळून लावली आणि याचिका दाखल करणाऱ्यांना 20 लाख रुपये दंड ठोठावला. त्या विरोधात जुही चावला यांनी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    सुनावणीच्या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आणि इतर दोन 5 जी-वायरलेस नेटवर्कविरुद्ध याचिका दाखल करण्याच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी असेही म्हटले होते की, याचिकाकर्ते दंडाची रक्कम आदरपूर्वक जमा करण्यास तयार नाहीत. न्यायाधीश मिधा म्हणाले होते की, न्यायालय आधीच या प्रकरणात शांत आहे आणि याचिकाकर्त्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला चालवण्याऐवजी केवळ दंड आकारला जाईल.