बाबा का ढाबा आठवतोय? आता ढाबेवाले बाबा झालेत अलिशान हॉटेलचे मालक

लोकांनी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया कांता प्रसाद यांनी दिलीय. आपण लोकांचे आभार मानत असून दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळेच आज हे दिवस आपण पाहू शकलो, असं त्यांनी म्हटलंय. इंडियन आणि चायनिज फूड ही त्यांच्या रेस्टॉरंटची खासियत आहे. या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या रेस्टॉरंटला भेट द्यावी, असं आवाहन कांता प्रसाद यांनी केलंय.

काही आठवड्यांपूर्वी कोरोना संकटामुळे आर्थिक गणित कोसळलेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा झाली होती. त्यांना मदतीची गरज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या होत्या. त्यानंतर कांता प्रसाद यांना सर्व स्तरातील नागरिकांनी मदत केली. आता कांता प्रसाद यांनी ढाबा बंद करून एक अलिशान हॉटेल सुरू केलंय.

लोकांनी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया कांता प्रसाद यांनी दिलीय. आपण लोकांचे आभार मानत असून दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळेच आज हे दिवस आपण पाहू शकलो, असं त्यांनी म्हटलंय. इंडियन आणि चायनिज फूड ही त्यांच्या रेस्टॉरंटची खासियत आहे. या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या रेस्टॉरंटला भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय.

काही आठवड्यांपूर्वी कांता प्रसाद यांचा पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतःवर ओढवलेली परिस्थिती सांगणारा व्हिडिओ समाजमाध्यमांत चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या ढाब्यावर येणाऱ्या ग्राहकांची संख्यादेखील वाढली होती. तोपर्यंत दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरात त्यांचा एक स्टॉल होता. त्यांच्या ढाब्यावर होणारा अन्नाचा खपदेखील मर्यादित होता. पण आता त्यांनी उघडलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाहीरातींसाठी कंपन्यांची रिघ लागताना दिसत आहे.

समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं कांता प्रसाद यांचं आयुष्यच बदलून टाकलं. आता त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणं आणि निघताना त्यांच्यासोबत सेल्फी काढणं लोकांना आवडू लागलंय.

दरम्यान, हा व्हिडिओ तयार करणाऱ्या यूट्यूबर गौरव वासनविरुद्ध कांता प्रसाद यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. गौरव वासननं हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर ‘बाबा का ढाबा’ला प्रसिद्धी मिळाली आणि ढाब्यावर येणाऱ्या ग्राहकांची संख्यादेखील वाढली. मात्र या व्हिडिओसोबत मदत करण्यासाठी जो अकाऊंट नंबर टाकण्यात आला, तो गौरवच्या नातेवाईकांचा असल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता.