बाबा रामदेवांचा यू टर्न, म्हणाले कोरोनावरील लस टोचून घेणार, डॉक्टर हे देवदूत असल्याचा साक्षात्कार

आपण कोरोनावरील कुठलीही लस टोचून घेणार नसून योगाच्या जोरावर कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी होऊ, असा दावा रामदेव बाबांनी केला होता. मात्र आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केलं असून कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस आपण घेणार असल्याचं म्हटलंय. लसीकरण धोरणात केलेल्या बदलाबद्दल त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारही मानलेत. त्याबरोबर डॉक्टरांचा आदरार्थी उल्लेख करत त्यांना देवदूत म्हटलंय.

    योगगुरु रामदेव बाबा आणि वाद हे समीकरण नवं नाही. रामदेव बाबांनी नुकतीच ऍलोपथीवर टीका केली होती आणि त्याला स्टुपिड सायन्स म्हटल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. कोरोनातून बरे होण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजनची गरज नसून आपण लस वगैरे घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    आपण कोरोनावरील कुठलीही लस टोचून घेणार नसून योगाच्या जोरावर कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी होऊ, असा दावा रामदेव बाबांनी केला होता. मात्र आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केलं असून कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस आपण घेणार असल्याचं म्हटलंय. लसीकरण धोरणात केलेल्या बदलाबद्दल त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारही मानलेत. त्याबरोबर डॉक्टरांचा आदरार्थी उल्लेख करत त्यांना देवदूत म्हटलंय.

    “योग आणि आयुर्वेद यांच्या जोडीला कोरोनावरील लसींची सुरक्षाही प्रत्येकाने घ्यावी. या दोन्हींच्या माध्यमातून सुरक्षेची एक मजबूत भिंत शरीरात तयार होईल. त्यामुळे देशातील एकाही नागरिकांचा बळी जाणार नाही”, असं रामदेव बाबांनी म्हटलंय. आपल्याकडचे डॉक्टर हे देवदूत असून आपण लवकरच त्यांच्याकडून कोरोनाची लस टोचून घेऊ, असं त्यांनी म्हटलंय.

    सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रामदेव बाबा यांच्यात सुरु असलेल्या वादाबाबत मौन बाळगणं रामदेव बाबांनी पसंत केल्याचं चित्र आहे. याबाबत विचारलं असता आपलं कुठल्याही संस्थेशी भांडण असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं रामदेव बाबा म्हणाले.