all 32 accused including LK Advani, Uma Bharati acquitted

विशेष कोर्टाने हा निकाल देताना माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी खासदार मुख्यमंत्री उमा भारती, ज्येष्ठ भाजपा नेते विनय कटियार यांच्यासह एकूण ३२ आरोपींना निर्दोष मुक्त केले.

दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस (Babri Masjid demolition) प्रकरणात आज कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाने बुधवारी अयोध्येत घडलेल्या घटनांविषयी निर्णय दिला. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष कोर्टाने हा निकाल देताना माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी खासदार मुख्यमंत्री उमा भारती, ज्येष्ठ भाजपा नेते विनय कटियार यांच्यासह एकूण ३२ आरोपींना (32 accused)  निर्दोष मुक्त केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्य गोपाल दास यांनी सहभाग घेतला होता, तर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात कोर्ट निकालाला ते काही कारणांस्तव उपस्थित राहू शकले नव्हते.