ऑगस्टपासून बॅंक हॉलिडे आणि रविवारी देखील जमा होणार तुमचा पगार, आरबीआयचा मोठा निर्णय

 १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर, वेतन, पेन्शन, विजबिले, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते इत्यादी सर्व बाबींची पूर्तता आता रविवारी, बॅंक हॉलिडे आणि इतर सुट्टयांच्या दिवशीदेखील करता येणार आहे.

    नवी दिल्ली : नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टम सर्व दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही सिस्टम कार्यरत राहणार आहे. शक्तिकांता दास (Shaktikanta Das) यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे.

    १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर, वेतन, पेन्शन, विजबिले, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते इत्यादी सर्व बाबींची पूर्तता आता रविवारी, बॅंक हॉलिडे आणि इतर सुट्टयांच्या दिवशीदेखील करता येणार आहे.

    रिझर्व्ह बॅंकेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना किंवा खातेधारकांनी ऑटो डेबिटची सुविधा ऑन केल्यानंतरही बॅंक हॉलिडे, सरकारी सुट्टया आणि रविवार या दिवशी ऑटो डेबिटची सुविधा अंमलात येत नव्हती. त्यामुळे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नोकरदारांचे पगार जमा होत नव्हते. नव्या नियमानुसार रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीदेखील ऑटो डेबिट सुविधा कार्यरत राहणार आहे