AC आणि Cooler वापरताना सावधान! गारवा मिळवताना कोरोनाला आमंत्रण देत आहात का ?

कॅब बसेस, वातानुकुलित शॉपिंग मॉल्स किंवा थिएटर्स आदी ठिकाणी हा संक्रमित ड्रॉपलेटच्या माध्यमातून हवेत बराच काळ राहू शकतो. परिणामी क्रॉस व्हेटिंलेशन नसल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो आणि तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येता ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता.

    नवी दिल्ली :  उकाड्यापासून वाचण्यासाठी एसी (AC) आणि कूलरचा (Cooler) वापर केला जातो आहे. पण गारवा मिळवता मिळवता तुम्ही कोरोना व्हायरसला तर तुमच्या घरात जागा देत नाहीत नाही, हे पाहा.

    नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणू हा एअरबॉर्न आहे. म्हणजेच तो हवेतून पसरतो. त्यामुळे एसी कॅब बसेस, वातानुकुलित शॉपिंग मॉल्स किंवा थिएटर्स आदी ठिकाणी हा संक्रमित ड्रॉपलेटच्या माध्यमातून हवेत बराच काळ राहू शकतो. परिणामी क्रॉस व्हेटिंलेशन नसल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो आणि तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येता ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता.

    घरात एसी (AC) वापरताना त्याचं तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावं.

    रोगजंतूमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी ४० ते ७०टक्के आर्द्रता पातळी ही सर्वात योग्य मानली जाते. खोलीतील वातानुकूलित थंड हवा रिसर्क्युलेट होण्यासाठी खोलीतील खिडकीची दारं थोडीशी उघडी ठेवावीत. यामुळे घरात साठलेली हवा बाहेर जाऊन नैसर्गिक हवा घरात खेळती राहिल.

    घरात संसर्ग झालेली व्यक्ती आणि संसर्ग नसलेल्या व्यक्ती एकत्र राहत असतील तर सेंट्रल वातानुकुलित यंत्रणेचा (Centralise AC) वापर टाळावा. प्रत्येक खोलीत स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा असावी.