संसदेत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून प्रवेश करण्यापूर्वी संसदेच्या पायऱ्यावर नतमस्तक झाल्या ‘या’ खासदार

भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नतमस्तक होत कायम स्वरुपी जनतेच्या सेवेत समर्पित

    नवी दिल्ली: संसदीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दिंडोरीच्या खासदार डॉ. भरती पवार पहिल्यांदाच संसदीय पावसाळी अधिवेशनास हजेरी लावत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत जात असताना डॉ. भारती पवार संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्या.
    “भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नतमस्तक होत कायम स्वरुपी जनतेच्या सेवेत समर्पित,” असे ट्विट भारती पवार यांनी केले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी विस्तार झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना स्थान मिळालं. त्यांना केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे.