mamata banerjee

पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल आता येणे सुरू झाले आहेत. या एक्झिट पोलनुसार राज्यातील जनता ममता बॅनर्जींनाच कौल देणार असल्याचे दिसत आहे. भाजपाला आक्रमक प्रचार मोहिमेच्या भरवशावर जागा वाढताना दिसत असल्या तरी सत्तेपासून तरी दूरच राहणार असल्याचे दिसते. तथापि आसाममध्ये भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुद्दुचेरीतही भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. केरळात भाजपाला मात्र फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच एक्झिट पोलने भाजपाला १ ते ५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.तामिळनाडूतही भाजपासोबत युती असलेल्या अद्रमुकला सत्ता दूरच असल्याचे दिसत असून द्रमुकच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    दिल्ली : पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल आता येणे सुरू झाले आहेत. या एक्झिट पोलनुसार राज्यातील जनता ममता बॅनर्जींनाच कौल देणार असल्याचे दिसत आहे. भाजपाला आक्रमक प्रचार मोहिमेच्या भरवशावर जागा वाढताना दिसत असल्या तरी सत्तेपासून तरी दूरच राहणार असल्याचे दिसते. तथापि आसाममध्ये भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुद्दुचेरीतही भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. केरळात भाजपाला मात्र फारसे यश मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच एक्झिट पोलने भाजपाला १ ते ५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.तामिळनाडूतही भाजपासोबत युती असलेल्या अद्रमुकला सत्ता दूरच असल्याचे दिसत असून द्रमुकच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    बंगालमध्ये भाजपा मारणार मुसंडी

    बंगालमध्ये २९२ जागांवर मतदान झाले. त्यापैकी १५०ते १७२जागांवर तृणमूलला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात भाजपाच्या जागा वाढणार असून १३२ जागांपर्यंत भाजपा मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस-डाव्यांना मात्र सर्वच एक्झिट पोलने १०-१५ जागाच मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

    आसामात भाजपाचे पुनरागमन

    आसाममध्ये एकूण १२६ जागा असून राज्यात भाजपाच पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. अधिकांश एक्झिट पोलने भाजपाला ७४ ते ८५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. तर काँग्रेस युतीला ४०-४५ जागाच मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर अन्य पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    पुद्दुचेरीत एनडीए!

    पुद्दुचेरीतही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर काँग्रेस-द्रमुक युतीला ११ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    केरळात काँग्रेसची पिछेहाट

    केरळात पुन्हा एकदा एलडीएफचे पुनरागमन होताना दिसत असून एलडीएफला १०० पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सत्ताधारी एलडीएफला ७० ते ९० जागा मिळणार असल्याचे तर यूडीएफ युतीला २० ते ६४ जागांवरच समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट होणार असल्याचे चित्रणच एक्झिट पोलने केले आहे.

    तामिळनाडूत स्टॅलिनच!

    तामिळनाडूत सत्ताधारी अद्रमुक यंदा सत्तेबाहेर जाणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. सर्वच एक्झिट पोलने अद्रमुकला ५५ ते ६८ जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला. तथापि द्रमुक काँग्रेसयुतीला १६० ते १७२ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसे जर घडले तर द्रमुक नेते स्टॅलिनची रणनीती यशस्वी ठरल्याचेच मान्य करावे लागेल.