नारायण राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, राणेंपाठोपाठ भागवत कराड मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

भाजप नेते नारायण राणे यांना काल अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. फोन येताच राणे गोव्याच्या दिशेने गेले आणि गोव्यावरून थेट दिल्ली गाठली. राणे दिल्लीत जात नाही तोच खासदार भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही दिल्लीकडे प्रयाण केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चांनी जोर धरला.

    नवी दिल्ली: भाजपचे खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पाटील-राणे कधीही महाराष्ट्रात कोणत्याही प्रश्नावर एकत्र आले नव्हते. आज दोघेही मोदींच्या भेटीला गेले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे.

    मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चाही दिल्लीच्या वर्तुळात आहे. त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, डाॅक्टर भागवत कराड हे महाराष्ट्राचे खासदार पीएम मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

    भाजप नेते नारायण राणे यांना काल अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. फोन येताच राणे गोव्याच्या दिशेने गेले आणि गोव्यावरून थेट दिल्ली गाठली. राणे दिल्लीत जात नाही तोच खासदार भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही दिल्लीकडे प्रयाण केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चांनी जोर धरला.

    मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात येत आहे.