#BharatBandh (LIVE) | आज ‘भारत बंद’, अरविंद केजरीवाल नजरकैदेत, या क्षणाचे अपडेट्स (Live) | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट10 महीने पहले

आज ‘भारत बंद’, अरविंद केजरीवाल नजरकैदेत, या क्षणाचे अपडेट्स (Live)

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
15:33 PMDec 08, 2020

हरियाणात आंदोलन सुरू असताना एक अँब्युलन्स आली आणि...

हरियाणामध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असताना रस्त्यावर एक अँब्युलन्स आली. ते पाहताच आंदोलक बाजूला झाले आणि त्यांनी अँब्युलन्सला वाट करून दिली. हरियाणातील अंबाला हिस्सार महामार्गावर ही घटना घडली.

15:17 PMDec 08, 2020

गृहमंत्री अमित शाह आजच शेतकऱ्यांना भेटणार

गृहमंत्री अमित शाह आजच काही शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. संध्याकाळी सात वाजता गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आपली बैठक असल्याचं भारतीय किसान युनीयनचे प्रवक्ते राकेश तिकैत यांनी सांगितलंय.

14:41 PMDec 08, 2020

अखिल भारतीय वकील संघटनेचा बंदला पाठिंबा

अखिल भारतीय वकील संघटनेनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. दिल्लीतील तीस हजारी कोर्टासमोर संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणात सरकारचा प्रतिसाद हा अत्यंत वाईट असून वकिलांची संघटना शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगण्यात आलं.

13:53 PMDec 08, 2020

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लालबागमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कायद्यात केलेल्या बदलांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई कौन्सिलचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिरामणी मार्केट लालबाग येथे आंदोलन झाले. 

खाजगीकरण थांबले पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो' अशी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ. प्रकाश सावंत, कॉ. गोविंद पाटकर आदी उपस्थित होते. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता काळाचौकी पोलिस ठाण्यातर्फे येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

13:04 PMDec 08, 2020

विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली - स्मृती इराणी

विरोधकांनी हा कायदा आणल्यानंतर शेतकऱ्यांची दिशाभूल केली. यापुढे एपीएमसी बंद होतील आणि किमान हमीभाव मिळणार नाही, असा गैरसमज पसरवल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. प्रत्यक्षात मात्र किमान हमीभावाची संकल्पना अधिक बळकट होणार असल्याचं त्या म्हणाल्या.

13:01 PMDec 08, 2020

मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली मालाड, मालवणीत आंदोलन

मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद' ला समर्थन देण्यासाठी आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली  काॅंग्रेससह सीपीएम, सीपीआई, राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मालाड रेल्वे स्थानक व मालवणी येथे तीव्र निदर्शने केली.

शेतकरी जगला तरच देश जगेल. या लढाईत शेतकरी एकटा नाही. काॅंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरुन दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हाच संदेश दिला आहे. तसेच मालवणी प्रवेशद्वार क्रमांक ७ येथे रॅली मधून मंत्री अस्लम शेख मालाडला जाण्यासाठी निघाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर काही वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली व आंदोलकांनी रस्ता जाम केल्यावर पोलिसांनी पुढे जाण्यास दिले. मालवणी क्रमांक १ येथे काही वेळ आंदोलकांनी निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, वरिष्ठ कॉम्रेड ऐ. सी श्रीधरन, अब्राहम थॉमस रईस शेख, मुश्ताक मेस्त्री, सद्दाम शेख आदि उपस्थित होते.

12:50 PMDec 08, 2020

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्रॅक्टर आंदोलन

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन शेतीविषयक कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सदर कायद्यांमुळे धनदांडगे व्यापारी आणखी श्रीमंत होतील तर देशातील शेतकरी मात्र देशोधडीला लागेल अशी भीती व्यक्त होत असल्याने याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत. पंजाब हरियाणा येथून सुरु झालेले हे विरोधाचे वारे आता संपूर्ण देशात पसरले असून सर्वच थरातून या आंदोलनाला समर्थन प्राप्त होत आहे. 

भाजपने लागू केलेल्या या कायद्यांमुळे विरोधकांच्या हातात आयतेच हत्यार मिळाले असून भाजपविरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. आज सर्वच पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी केंद्रातील भाजप सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेले तेरा दिवस दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असून त्यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून सर्व ठाणेकरांनी या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळावा, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

12:48 PMDec 08, 2020

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्रॅक्टर आंदोलन

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन शेतीविषयक कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सदर कायद्यांमुळे धनदांडगे व्यापारी आणखी श्रीमंत होतील तर देशातील शेतकरी मात्र देशोधडीला लागेल अशी भीती व्यक्त होत असल्याने याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत. पंजाब हरियाणा येथून सुरु झालेले हे विरोधाचे वारे आता संपूर्ण देशात पसरले असून सर्वच थरातून या आंदोलनाला समर्थन प्राप्त होत आहे. 

भाजपने लागू केलेल्या या कायद्यांमुळे विरोधकांच्या हातात आयतेच हत्यार मिळाले असून भाजपविरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. आज सर्वच पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी केंद्रातील भाजप सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेले तेरा दिवस दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असून त्यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून सर्व ठाणेकरांनी या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळावा, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

12:13 PMDec 08, 2020

तेलंगणात आंदोलनाला जोर

तेलंगणात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरएसनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं  आणि घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवलाय. टीआरएस नेत्या के. कविता, केटी रामा राव आणि इतर नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नव्या कृषी कायद्यांविरोधात घोषणा दिल्या.

11:35 AMDec 08, 2020

मुंबईतील डबेवाल्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना समूळ नष्ट करणारे आहेत. त्यांच्या मागण्या रास्त असून शेतकऱ्यांच्या बंदला आपला पाठिंबा असल्याचं मुंबई डबेवाला असोसिएशननं म्हटलंय.

Load More

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनानं आज ‘भारत बंद’ची हाक दिलीय. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन द्यावं, असं आवाहन आंदोलक शेतकऱ्यांनी केलंय.

आजच्या ‘भारत बंद’ला देशातील बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय. राजकीय पक्षांसोबत वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक संघटनादेखील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. केंद्र सरकारने केलेले ३ कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, पीएजीडीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्रक काढत शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या योग्य मागण्या मान्य कराव्यात, असंही या निवेदनात म्हणण्यात आलंय.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बंदला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आपला शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीदेखील या बंदला पाठिंबा जाहीर केलाय.

अभिनेता कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षानंही या बंदला पाठिंबा दिलाय. आम आदमी पक्षानंही या बंदचं समर्थन कऱण्याचा निर्णय घेतलाय. तर आसाममध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सरकारनंही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

कशाकशावर परिणाम होणार?

अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांश सेवांवर या बंदचा परिणाम दिसेल, अशी शक्यता आहे. रेल्वेच्या सेवेवरदेखील या आंदोलनाचा परिणाम दिसू शकतो. रस्ते अडवले गेल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसोबत राजकीय पक्षही रस्त्यावर उतरणार असल्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२७ सोमवार
सोमवार, सप्टेंबर २७, २०२१

महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.