children infected with corona

कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकनं २ ते १८ वयोगटासाठी लस तयार केली असून त्याची चाचणी सुरू आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं ही प्रक्रिया राबवली जात आहे. या लसीची फेज १ मधील चाचणी यशस्वी झाली असून आता फेज २ आणि फेज ३ ची चाचणी आता होणार आहे. 

  देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याची चर्चा सुरू असतानाच आता २ ते १८ या वयोगटासाठी कोरोनाच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी सरकारनं लसीची घोषणा केलीय. मात्र प्रत्यक्षात लसींचा साठाच नसल्याने या वयोगटाला अद्याप प्रतिक्षाच करावी लागत असताना २ ते १८ वयोगटासाठी मात्र लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकनं २ ते १८ वयोगटासाठी लस तयार केली असून त्याची चाचणी सुरू आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं ही प्रक्रिया राबवली जात आहे. या लसीची फेज १ मधील चाचणी यशस्वी झाली असून आता फेज २ आणि फेज ३ ची चाचणी आता होणार आहे.

  हैद्राबाद स्थित भारत बायोटेकनं लहान मुलांसाठीची लस तयार असल्याचा अर्ज केल्यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC) कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात करण्यात आलीय. देशातील वेगवेगळ्या ५२५ ठिकाणी या लसीची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

  दुसऱ्या चाचणीचा डेटा बोर्डाकडे सोपवावा लागणार

  तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी देण्यापूर्वी, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती डेटा अन्ड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाला (DSMB) द्यावी लागणार आहे. यापूर्वी २४ फेब्रुवारीला या प्रस्तावार चर्चा करण्यात आली होती. त्यानंतंर भारत बोयोटेकला याबाबत सुधारित क्लिनिकल चाचण्यांचे नियम सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
  भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) च्या सहकार्याने भारत बायोटेकने निर्मित केलेल्या स्वदेशी लशींचे डोस देशभरात १८ वर्षांवरील लसीकरणासाठी पावरले जात आहेत

  ही लस बाजारात आल्यानंतर लहान मुलांना असणारा कोरोनाचा धोका पूर्णतः टळेल, असं सांगितलं जातंय. लहान मुलांतमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निसर्गतःच चांगली असते. त्यात मुलांना लस मिळाली, तर मात्र शाळा, क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेज सुरू करणं शक्य होणार आहे.