पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराची पायाभरणी, भूमिपूजन सोहळा संपन्न

  • पंतप्रधान मोदी २८ वर्षानंतर अयोध्येत दाखल झाले आहेत. ते एकत्र तीन विक्रम करणार आहेत. श्री रामजन्मभूमीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधानांनी अयोध्याच्या हनुमानगडीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच देशाच्या सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे प्रतीक असलेल्या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नावदेखील नोंदवले जाईल.

शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्णत्वास येत आहे. करोडो हिंदूंच्या मनातील राम मंदिराला आकार येत आहे. या ऐतिहासिक मंदिर उभारणीच्या कामाचस आज शुभारंभ होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. कोरोनाचे सावट असतानाही कडक नियम पाळू सर्व कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. अयोध्येतील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे. प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गढीला भेट देतील आणि हनुमानाची पुजा करणार आहेत. त्यानंतर रामल्लाचे दर्शन घेतील व भूमिपूजन समारंभात सहभागी होणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘श्री राम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. 

राम मंदिर जन्मभूमिपूजनासाठी १७५ अतिथींना निमंत्रित केले आहे. त्यातील १३५ अतिथी हे साधू महंत तर उर्वरित ४० अतिथी विशेष पाहूणे आहेत. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर विशेष कोड असल्यामुळे फक्त निमंत्रितांना तेथे प्रवेश मिळणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीकडे रवाना झाले आहेत. भूमिपूजनाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ४४ मिनिट ८ सेकंदानी सुरु होणार आहे. भूमिपूजनासाठी शुभ मुहूर्त ३५ सेकंदाचा असल्याने भूमिपूजन सुरु होऊन ३५ सेकंदात संपणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीत पोहचले, हनुमान गढीकडे जात हनुमानचे घेतले दर्शन

 

हनुमानगढ़ी येथे पंतप्रधानांना चांदीचा मुकुट आणि हनुमान गदा भेट दिली.

राम जन्मभूमि परिसरात पोहचले मोदी, राम लल्ला विराजमान पुजेस प्रारंभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलल्लाच्या दर्शनानंतर केले पारिजात वृक्षारोपण. कार्यक्रमा दरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे होत आहे काटोकोर पालन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले राम लल्ला चे दर्शन[/caption]

भूमिपूजनास प्रारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात. 

मंत्रोचरणेस केली सुरुवात, भक्तीमय वातावरणात गजबजली अयोध्या 

 

        RSS प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रगदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजेला बसल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करताना

अयोध्येस नाही जाऊ शकलात मग करा राम लल्लाचे लाईव्ह दर्शन 

राम जन्मभूमी संकुलात भूमिपूजन आणि शिलापूजन विधीला सुरुवात झालेली आहे.

 पंतप्रधान मोदी २८ वर्षानंतर अयोध्येत दाखल झाले आहेत. ते एकत्र तीन विक्रम करणार आहेत. श्री रामजन्मभूमीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधानांनी अयोध्याच्या हनुमानगडीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच देशाच्या सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे प्रतीक असलेल्या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नावदेखील नोंदवले जाईल.

पंतप्रधना नरेंद्र मोदींनी रामल्ला साठी खास भेट आणली आहे. परंतु ते घाई गडबडी आपल्या गाडीत विसरले. त्यांना आठवण झाल्यावर पुन्हा आपल्या गाडीकडे गेले आणि राम लल्ला साठी आणलेली भेटवस्तु गाडीतुन घेतली. 
 
नऊ विटा येथे ठेवल्या आहेत. या १९८९ मध्ये जगभरातील रामभक्तांनी पाठवल्या आहेत. अशा २ लाख ७५ हजार विटा आहेत त्यातील १०० विटा ‘जय श्री राम’ कोरलेल्या आहेत. ” 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचे दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या शीला ठेवल्या.

पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला मोहन भागवत आसनस्थ आहेत.

जय श्री राम आणि हर-हर महादेव घोषणा देत पीएम मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली. १२ ते ४४ मिनिटांच्या वेळी ठेवली वीट.

          पंतप्रधानांनी भूमिपूजनाची वीट ठेवल्यांनतर कार्यक्रम झाला संपन्न

९ विटांची पूजा करण्यात आली. मध्यभागी असलेली विट म्हणजे कुरमा . या विटेच्या अगदी वर रामलला बसलेला असेल.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबोधित करत आहेत. योगी भावूक झाले. भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, आरएसएस प्रमुख भागवत व्यासपीठावर वीराजमान झालेत.

राम मंदिर शिलान्यास