Big companies like ITC, Mahindra Group will buy corona vaccine for their employees

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. कोरोना काळात अनेकजण आपल्या मूळ गावी परत गेल्याने याचा मोठा फटका कंपन्यांनाही बसलाय. यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय देशातील बड्या कंपन्यानी घेतला आहे. या अनुषंगाने लस खरेदीसाठी हलचाली सुरु झाल्याचीही चर्चा आहे.

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. कोरोना काळात अनेकजण आपल्या मूळ गावी परत गेल्याने याचा मोठा फटका कंपन्यांनाही बसलाय. यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय देशातील बड्या कंपन्यानी घेतला आहे. या अनुषंगाने लस खरेदीसाठी हलचाली सुरु झाल्याचीही चर्चा आहे.

स्टील उत्पानद श्रेत्रातील अग्रेसर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड, त्याचबरोबर महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या निर्णय घेतलाय. तर, हिंदुस्तान युनिलिव्हरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यास सांगितलं आहे.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रांनाही आम्ही आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी करोनाची लस विकत घेऊ इच्छितो असं सांगितलं आहे. सरकारने ठरवलेल्या धोरणांनुसारच आम्ही यासंदर्भातील निर्णय घेऊन असंही महिंद्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारकडून प्रथामिक स्तरावर करोना लसीची मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. त्यावेळी या बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करोनाची लस विकत घेणार आहेत. या कंपन्यांनी लस निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधला आहे.
भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे.