स्कूल चले हम! दिल्लीत 1 सप्टेंबरपासून शाळेची घंटा वाजणार ?; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने शाळेबाबत एक पाऊल मागे टाकले आहे. मागील दोन महिन्यांपासून कोरोनावर नियंत्रण असल्यामुळे रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचा केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमणामुळे दिल्लीत (Delhi) मागील दीड वर्षांपासून शाळा बंदच आहे. परंतु दिल्लीत 1 सप्टेंबरपासून शाळा (School) सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून केजरीवाल सरकारने शाळेबाबत मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या संपूर्ण देशात ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरवले जात आहेत. त्याचप्रमाणे यंदाही एप्रिलच्या महिन्यात शाळेची घंटा वाजणार अशा प्रकरची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यामुळे शाळेला पुन्हा एकदा टाळं लागलं आहे.

    शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार

    दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने शाळेबाबत एक पाऊल मागे टाकले आहे. मागील दोन महिन्यांपासून कोरोनावर नियंत्रण असल्यामुळे रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचा केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर 8 सप्टेंबरपासून 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    DDMA च्या बैठकीत झाला निर्णय

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, कोरोनाची रूग्णसंख्या दिल्लीत कमी होत आहे. आज DDMAची बैठक पार पडली. यामध्ये दिल्लीत education activity ला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं पाहीजे. जो अभ्यास शाळेमध्ये होतो. तो ऑनलाईनच्या माध्यमातून कठीण आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा ही इतर शैक्षणिक उपक्रमांसह सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.