वर्षभरापासून थकलेला महागाई भत्त्या बाबात मोठा निर्णय; अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्याचे १ जानेवारी २०२०२, १ जुलै २०२०२ आणि १ जानेवारी २०२१ असे तीन हप्ते रोखले होते. थकलेला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्राच्या ५० लाख कर्मचाऱ्यांबरोबर ६५ लाख पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

    दिल्ली : लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक खूशखबर आहे. वर्षभरापासून थकलेला महागाई भत्ता मिळणार आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत याबाबतची माहिती दिली. यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

    कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्याचे १ जानेवारी २०२०२, १ जुलै २०२०२ आणि १ जानेवारी २०२१ असे तीन हप्ते रोखले होते. थकलेला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्राच्या ५० लाख कर्मचाऱ्यांबरोबर ६५ लाख पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

    लवकरच १ जुलै २०२१ च्या महागाई भत्त्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे. यावेळेस थकलेल्या तीन वेळचा भत्ताही दिला जाणार असल्याचे अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगीतले. कोरोनाकाळात केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांचा महागाई भत्ता रोखल्याने आर्थिक संकटाचा सामना करताना सरकाराना या निधीची मोठ्या प्रमाणात मदत झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या १७ टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. सध्याचा भत्ता हा जुलै २०१९ पासून लागू आहे. यामध्ये जानेवारी २०२० मध्ये वाढ करण्यात येणार होती. हा भत्ता ४ टक्क्यांनी वाढून २१ टक्के करण्यास मंजुरीदेखील मिळाली होती. परंतू अद्याप तो लागू करण्यात आलेला नाही.