केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्याची मर्यादा वाढविण्याचा मोठा निर्णय, आता ‘ही’ रक्कम मिळणार दुप्पट

या आदेशानुसार, प्राचार्यां (Principal) व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शासकीय किंवा CGHS नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्या उपचारांची रोख मर्यादा ५००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. हा आदेश १४ मेपासून अंमलात आणण्यात आला आहे.

    कोरोना महामारीच्या काळात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय भत्त्याची(Medical Claim Reimbursement) मर्यादा (Ceiling) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नवोदय विद्यालय समितीच्या (Navodaya vidyalaya samiti) कर्मचाऱ्यांना आता ५ पट अधिक वैद्यकीय भत्ता (मेडिकल क्लेम) मिळणार आहे.

    या आदेशानुसार, प्राचार्यां (Principal) व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शासकीय किंवा CGHS नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्या उपचारांची रोख मर्यादा ५००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. हा आदेश १४ मेपासून अंमलात आणण्यात आला आहे.

    यावर शिक्षण विभागाचे सांगणे आहे की, खासगी डॉक्टर कामावर घेण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या निर्णयानुसार आहे. यापूर्वी, प्रादेशिक कार्यालय सर्व प्राचार्यांना सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना पाठवेल आणि त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागेल. हा भत्ता CGHS (Central Government Health Srvices) क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.