
नितीश कुमार यांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? यामागचं नेमकं कारण आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी सांगितलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केले आहे.
नवी दिल्ली : नितीश कुमार यांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? यामागचं नेमकं कारण आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी सांगितलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केले आहे.
बिहारच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. नितीश कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मला मुख्यमंत्रिपद नको. ‘मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,’ असं नितीश कुमार म्हणाले.
“नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. भाजपा आणि जदयूच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांच्यासाठी मतदान केलं आहे. जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे.
He didn't want to be the CM. BJP & JDU leaders told him that we fought the poll on his name & vision & said that people had voted for him. In the end, he accepted to become the CM on request of JDU, BJP & VIP leaders: BJP leader Sushil Kumar Modi https://t.co/IHUy9rMHJU pic.twitter.com/G8a3m7HOX3
— ANI (@ANI) December 28, 2020
पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचं नेतृत्त्व करतील अशी चर्चा आहे.