बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचे कोरोनामुळे निधन

बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार सुरू होते. १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अरुण कुमार सिंह यांच्या निधनानंतर बिहारमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

    नवी दिल्ली: वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशात सर्वच ठिकाणी बसता आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार सुरू होते. दीपक कुमार हे निवृत्त झाल्यावर अरुण सिंह यांनी बिहारच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती.

    १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अरुण कुमार सिंह यांच्या निधनानंतर बिहारमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अरुण कुमार सिंह यांच्या निधनानंतर बिहार राज्य मंत्रिमंडळाने सुद्धा शोक व्यक्त केला आहे.

    याशिवाय राजधानीतील  कोरोनाची स्थितीही गंभीर होताना दिसून येत आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनिल बैजल यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यांनी स्वत:ला होम आयसोलेट केले आहे. ‘कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. कोविडची लक्षणे सुरू झाल्यापासून मी स्वत:ला आयसोलेट केले आहे आणि सर्वांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोविड चाचणी करावी.