एसबीआयवर रिजर्व बँकेने ठोठावला कोट्यवधींचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती देत सांगितले की,३१ मार्च २०१७ आणि ३१ मार्च २०१८ मध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीचा तपास करण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने रिस्क असेसमेंट रिपोर्टचीही तपासणी केली आहे. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेने एसबीआयला आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या कमिशनचा विस्तार करण्यास सांगितले. तसेच, बँकेने दिलेल्या उत्तरावर आरबीआय समाधानी नाही. यानंतर आरबीआयने त्यांच्यावर दंड आकारला आहे.

    दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) वर आरबीआयने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. १६ मार्चल जारी केलेल्या अधिकृत विधानानुसार, एसबीआयने काही नियामकांचे पालन केले नाही ज्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने १५ मार्च २०२१ ला एक ऑर्डर जारी करून हा दंड आकारला आहे. आरबीआयने एका परीपत्रकात सांगितले आहे की, नियामक नियम न स्वीकारल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.
    केंद्रीय बँकेच्या एका पत्रकानुसार, दंड बँक नियमन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे आणि कमिशनच्या रूपाने बँक कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याच्या संदर्भात देण्यात आलेल्या सुस्पष्ट सूचनांसाठी ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती देत सांगितले की,३१ मार्च २०१७ आणि ३१ मार्च २०१८ मध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीचा तपास करण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने रिस्क असेसमेंट रिपोर्टचीही तपासणी केली आहे. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेने एसबीआयला आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या कमिशनचा विस्तार करण्यास सांगितले. तसेच, बँकेने दिलेल्या उत्तरावर आरबीआय समाधानी नाही. यानंतर आरबीआयने त्यांच्यावर दंड आकारला आहे.

    रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ ची कलम १० (१) (b) (ii) चे उल्लंघन आणि कर्मचाऱ्यांना कमिशनच्या रुपात वेतन देण्याच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एसबीआयवर २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.