ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं महाराष्ट्र सरकारनेच कोर्टाला सांगितलं ; संबित पात्रांचा राऊतांवर पलटवार

 ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं त्यांच्याच सरकारने कोर्टात सांगितलं. या प्रकरणी काही लोक कोर्टात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला ही माहिती दिली होती. ऑक्जिनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा केंद्र सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचं खुद्द मुंबई महापालिकाचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे, असं पात्रा म्हणाले.

    नवी दिल्ली: ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं महाराष्ट्र सरकारनेच कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे संजय राऊतांना कदाचित सत्य माहीत नसावं, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

    ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं त्यांच्याच सरकारने कोर्टात सांगितलं. या प्रकरणी काही लोक कोर्टात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला ही माहिती दिली होती. ऑक्जिनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा केंद्र सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचं खुद्द मुंबई महापालिकाचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे, असं पात्रा म्हणाले.

    ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष अजून राजकारणच करत आहे. काल केंद्र सरकारने कोरोनाबाबतचं सादरीकरण केलं. त्या बैठकीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. बैठकीला यायचं नाही आणि टीका करायचं हे योग्य नाही, असं ते म्हणाले.