Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान कार्यालय सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे खूपच नम्र असून त्यांच्या खात्याचं काम त्यांना मोकळेपणानं करू दिलं जात नाही. इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवादानंतरही भारत टिकून राहिला, तसाच तो कोरोना आक्रमणानंतरही टिकून राहिल. मात्र आता आपण हे गांभिर्यानं घेतलं नाही, तर आणखी एक लाट येईल आणि आपल्या लहान मुलांच्याही आरोग्यावर परिणाम करेल, असं स्वामींनी म्हटलंय. 

    देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा दररोज ३ लाखांचा टप्पा ओलांडत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणासह अन्य आरोग्य सुविधा पुरवण्यात सरकारच्या मर्यादा उघड होत असल्याचं दिसून येत असल्याची टीका होऊ लागलीय. या पार्श्वभूमीवर देशाच्या आरोग्य खात्याची जबाबदारी नितीन गडकरींच्या खांद्यावर देण्याची मागणी जोर धरतेय.

    देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान कार्यालय सपशेल अपयशी ठरल्याची टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे खूपच नम्र असून त्यांच्या खात्याचं काम त्यांना मोकळेपणानं करू दिलं जात नाही. इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवादानंतरही भारत टिकून राहिला, तसाच तो कोरोना आक्रमणानंतरही टिकून राहिल. मात्र आता आपण हे गांभिर्यानं घेतलं नाही, तर आणखी एक लाट येईल आणि आपल्या लहान मुलांच्याही आरोग्यावर परिणाम करेल, असं स्वामींनी म्हटलंय.

    पीएमओ परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामींनी केलीय. या मागणीनंतर ट्विटरवर अनेकांची याचं समर्थन केलंय. कोरोनाची बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी नितीन गडकरी हेच योग्य मंत्री असून त्यांंच्याकडेच ही जबाबदारी द्यावी, अशी जोरदार मागणी नेटिझन्स करत आहेत.