भाजपा खासदारांना केंद्राची सुरक्षा; गृहमंत्रालयाचा निर्णय

बंगालमधील भाजपाचे आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या खासदार वडिल आणि भावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘‌व्हाय प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. शुभेंदू यांचे वडील खासदार शिशिर अधिकारी आणि त्यांचे बंधू खासदार दिव्येंदू अधिकारी यांना केंद्रीय सुरक्षा दलांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर मंत्रालयाने सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या दोघांच्याही सुरक्षेसाठी आता सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आले आहे.

    दिल्ली : बंगालमधील भाजपाचे आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या खासदार वडिल आणि भावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘‌व्हाय प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. शुभेंदू यांचे वडील खासदार शिशिर अधिकारी आणि त्यांचे बंधू खासदार दिव्येंदू अधिकारी यांना केंद्रीय सुरक्षा दलांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर मंत्रालयाने सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या दोघांच्याही सुरक्षेसाठी आता सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आले आहे.

    या अहवालात शिशिर आणि दिव्येंदू अधिकारी यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. शुभेंदू अधिकारी यांना सीआरपीएफची झेड दर्जाची सुरक्षा पुरविली जात आहे. शुभेंदू बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.

    अधिकारी कुटुंब पूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते. सुवेंदू यांनी ज्यावेळी पक्ष बदलला आणि भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी शिशिर अधिकारी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही ते सामील झाले होते.

    पश्चिम बंगालच्या सत्तेची तिसऱ्यांदा जबाबदारी सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तडकाफडकी निर्णय घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार अतिरिक्त संचालक (सुरक्षा) ज्ञानवंतसिंह यांना अतिरिक्त महासंचालक सीआयडीपदी नियुक्त केले आहे. त्यांच्यावर सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त संचालकपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक अनुज शर्मा यांना सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.