BJP national president JP Nadda's planned Mumbai tour canceled, quarantined due to corona symptoms

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी नड्डा यांच नियोजित दौरा महत्त्वपूर्ण ठरणार होता.

  • BJP national president JP Nadda's planned Mumbai tour canceled, quarantined due to corona symptoms

दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP national president JP Nadda) पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्र दौरा करणार होते. महाराष्ट्रात येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. १८ आणि १९ डिसेंबरला त्यांचा नियोजित दौरा होता. मुंबई आणि ठाण्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन (quarantined)  करुन घेतले आहे. त्यामुळे त्यांचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी नड्डा यांच नियोजित दौरा महत्त्वपूर्ण ठरणार होता. परंतु कोरोनाच्या लक्षणांमुळे त्यांनी दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे. परंतु पुन्हा दौऱ्याचे नियोजन करुन पुढची तारिख निश्चित कळविण्यात येणार आहे.