पोटनिवडणुकांसाठी भाजपातर्फे खंडवातून ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी

मोहन डेलकर यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर हवेलीची जागा रिकामी झाली होती. लोकसभेसोबतच 16 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका होत आहेत. यात पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, हरयाना आणि आंध्रप्रदेशसह इतर काही राज्यातील जागांचा समावेश आहे.

    दिल्ली (Delhi). येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभांच्या पोटनिवडणुकांसाठी (Assembly by-elections) भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha constituency) ज्ञानेश्वर पाटील यांना तर हिमाचल प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघातून बलदेव ठाकूर (Baldev Thakur) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे. मोहन डेलकर यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर हवेलीची जागा रिकामी झाली होती. लोकसभेसोबतच 16 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका होत आहेत. यात पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, हरयाना आणि आंध्रप्रदेशसह इतर काही राज्यातील जागांचा समावेश आहे.

    कर्नाटकातील सिंदगी विधानसभा मतदारसंघात पक्षाने रमेश भूषणरू यांना तिकीट दिले असून हंगल मतदारसंघात शिवराज सज्जनहर यांना तिकीट दिले आहे. राजस्थानमधील वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघातून क्रमशः हिम्मतसिंग झाला आणि खेतसिंग मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे.