२० वर्षीय तरुणीवर भाजप पदाधिकाऱ्याचा सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

महिला सुरक्षेची हमी देणाऱ्या भाजप पक्षाच्या मध्य प्रदेशातील एका पदाधिकाऱ्याने एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. शहडोल जिल्हयाचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय त्रिपाठी असे आरोपी पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

    दिल्ली (Delhi).  महिला सुरक्षेची हमी देणाऱ्या भाजप पक्षाच्या मध्य प्रदेशातील एका पदाधिकाऱ्याने एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. शहडोल जिल्हयाचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय त्रिपाठी असे आरोपी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे.

    अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं, की तरुणीचं अपहरण करुन तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारु पाजली आणि 18 तसंच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला. या कृत्यात अन्य चार जणांचाही समावेश आहे.

    वैश्य यांनी सांगितलं, की या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून गेले. यानंतर पीडितेनं रविवारी 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.