काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि फेसबूक
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि फेसबूक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी फेसबुक नियंत्रणावरून पुन्हा एकदा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेतली आणि बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला, असा दावा अमेरिकेच्या एका वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यावरून राहुल गांधींनी भाजपा आणि संघाला लक्ष्य केले आहे. भाजपा आणि संघाचे भारतातील फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

दिल्ली (Delhi).  काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी फेसबुक नियंत्रणावरून पुन्हा एकदा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेतली आणि बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला, असा दावा अमेरिकेच्या एका वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यावरून राहुल गांधींनी भाजपा आणि संघाला लक्ष्य केले आहे. भाजपा आणि संघाचे भारतातील फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

… म्हणून बजरंग दल दहशतवादी संघटना नाही
जून महिन्यात दिल्लीबाहेर एका चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर बजरंग दलाचा धोकादायक संघटनांमध्ये समावेश करावा, अशी मागणी होत होती. अमेरिकन वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकच्या एका इंटर्नल रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतातील सत्ताधारी हिंदू राष्ट्रवादी नेते, बजरंग दलावर बंदी घातल्यास फेसबुक कर्मचाऱ्यांवर किंवा कंपनीला मिळणाऱ्या सुविधांवर हल्ला होण्याचा धोका आहे. यामुळेच, फेसबुकच्या सुरक्षा टीमकडून संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्यानंतरही भारतात अल्पसंख्यांकाविरोधात हिंसेचे समर्थन करणाऱ्या बंजरंग दलाबाबत फेसबुकची नरमाईची भूमिका असल्याचे अमेरिकन वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पक्षपातीपणाचे आरोप फेटाळले
वॉल स्ट्रीट जर्नलच्या नव्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाचा एक व्हीडिओ आणि त्याच्यावर फेसबुकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे. यामध्ये जून महिन्यात नवी दिल्लीत एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हीडिओ अडीच लाख वेळा पाहिला गेला होता. दुसरीकडे, यावर प्रतिक्रिया देताना, धोकादायक संघटना किंवा व्यक्तीचा टॅग देण्यासाठी आम्ही त्यांची राजकीय ओळख काय आहे किंवा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, असा भेदभाव करत नाहीत, असे म्हणत फेसबुकने एखाद्या राजकीय पक्षासाठी पक्षपातीपणा केल्याचे आरोप फेटाळले आहेत.