अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य यांच्या ‘त्या’ टिकेला भाजपानं दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले ?

सेन म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असं मी अहंकाराने म्हणणार नाही. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी केलेली विधानंही आपण विसरायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारविरुद्ध ते जे काही बोलले आहेत. ते पूर्णपणे राजकीयच आहे, अशी टीका भट्टाचार्य यांनी केली आहे.

    नवी दिल्ली :  भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मांडली होती. परंतु सेन यांच्या या भूमिकेवर भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. सेन हे म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असं मी म्हणणार नाही. पण त्यांनी मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी केलेली विधानंही आपण विसरायला नको, असं उत्तर पश्चिम बंगाल भाजपाच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे.

    पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सेन यांच्यावर टीका केली आहे. संपूर्ण जगासमोर सेन मोदी सरकारवर टीका करू शकत नाही. त्यांनी मोदी सरकारवर केलेली टीका पूर्णपणे राजकीय होती,असं भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.